Ticker

6/recent/ticker-posts

शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणी महिला आयोगाने उचलले हे धाडसी पाऊल; थेट कारवाईचे दिले आदेश

 



मुंबई :  शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावरून प्रचंड व्हायरल करण्यात आला होता. त्यावर आक्षेप नोंदवत शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता सार्वजनिक ठिकाणी अश्लिल कृत्य केल्याच्या आरोपाखाली म्हात्रे यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाने केली होती. त्यामुळे आता दोन्ही गटाचा हा वाद चालू असतानाच महिला आयोगाने धाडसी निर्णय घेत आता या प्रकरणातील सत्यता तपासून त्याची चौकशी करण्याची मागणी गृह विभागाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ठोस भूमिका घेत शीतल म्हात्रे यांच्या व्हिडीओ प्रकरणी आता गृह विभागाने कडक भूमिका घेऊन त्याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे

त्यामुळे आता हे प्रकरण गृह विभागाकडे गेल्याने या प्रकरणातून नेमकं काय बाहेर पडणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या प्रकरणी महिला आयोग गांभीर्यानेविचार करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.या प्रकरणी त्या म्हणाल्या की, शीतल म्हात्रे यांच्याबाबतीतचा व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.

 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement