Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रात भरणार शासकीय योजनांची जत्रा’ – जिल्ह्यात ७५०००+ लाभार्थ्यांना योजनांचा लाभ दिला जाणार !

 

शासकीय-योजनांची-जत्रा

Maharashtra Govt : सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात 'शासकीय योजनांची जत्रा' हा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतला आहे.

Maharashtra Govt : सरकारी योजनांचा (Government scheme) लाभ पात्र लोकांना मिळवून देण्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून 'शासकीय योजनांची जत्रा' हा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात 'शासकीय योजनांची जत्रा' होणार आहे. किमान 75 हजार लाभार्थ्यांना या शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 

सिबिल स्कोअरची अट न लावता बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज द्यावं-एकनाथ शिंदे


लाभार्थींपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा उपक्रम राबविला जाणार आहे. शेवटच्या गरजू लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावं. प्रत्येक यंत्रणेचा या जत्रेमध्ये सहभाग राहणार आहे. यंत्रणेने या जत्रेच्या दृष्टीने काम करत असलेल्या कामांचा अहवाल जिल्हा जनकल्याण कक्षाला दररोज सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षांनिमित्त 36 विभागामार्फत 75 शासकीय योजनांची माहिती आणि लाभ प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थीना देण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

येथे करा आपल्या व्यवसायाची जाहिरात