Ticker

6/recent/ticker-posts

देशात वाढतायत कोरोना रुग्ण, महाराष्ट्रात आढळले ३२८ नवीन रुग्ण

 

Corona-covid-india-tracker-maharashtra

देशात आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, मागील २४ तासात राज्यात ३२८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे, आतापर्यंत ४६६७ सक्रिय कोरोना रुग्ण राज्यात आढळून आले आहेत. 

काल महाराष्ट्रात ७८८ नवे कोरोना रुग्ण आढळले होते, तर एका रुग्णांचा मृत्यू झाला होता. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता प्रशासनाने त्याचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. लोकांनी घाबरून जाण्याऐवजी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.२४७ रुग्ण आज कोरोनातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१२ टक्के आहे. राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४,६६७ वर पोहोचली आहे.

कोविड-19 ने अनेक राज्यांसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा थैमान घातले आहे. तीन वर्षांनंतर परत कोरोनाने डोक वर काढले आहे. आरोग्य विभागाच्या उच्च अधिकार्‍यांच्या मते, मार्चच्या सुरुवातीपासून राज्यातील कोविड प्रकरणांची संख्या हळूहळू वाढत आहे. यावर्षी ६ फेब्रुवारी रोजी नवीन संसर्गाची किमान एक प्रकरणे समोर आली होती. पुढील ६० दिवसांत ते ९२६ पर्यंत वाढले आहे.

सर्वच राज्यांनी कोरोना रोखण्यासाठी जिनोम सिक्वेसिंग वाढवली आहे. लोकांना कोविड प्रोटोकॉलचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. तसेच मास्क अनिवार्य करण्यात आलं असून टेस्टिंग वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.तसेच कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, काळजी घ्यावी. सतर्कता बाळगावी, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement