Ticker

6/recent/ticker-posts

"बीआरएस"ची छ.संभाजीनगरमध्ये सभा केसीआर राहणार उपस्थित

 

brs party convention in maharashtra
भारत राष्ट्रीय समिती BRS

हाराष्ट्र सरकारचे उत्पन्न हे तेलंगणा सरकारच्या तिप्पट असून सुद्धा शेतकऱ्यांना इथे सुविधा मिळत नाहीत. तेलंगणातील शेतकऱ्यांना एकरी खरीप व रब्बी हंगामात एकूण दहा हजार रुपये अनुदान दिले जाते.

महाराष्ट्रात नैसर्गिकदृष्ट्या पाणी भरपूर पडत असूनसुद्धा ओलितापासून इथे वंचित राहावे लागते. इतरत्र कोरडवाहू शेती करून शेतकरी आत्महत्या करीत आहे, तेलंगणामध्ये पाणी व वीज मोफत दिल्या जाते.

महाराष्ट्रात ही शेतकऱ्यांचे सरकार यावे यासाठी भारत राष्ट्रीय समितीची (बीआरएस) सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये २४ एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती बीआरएसचे शेतकरी नेते धनंजय पाटील काकडे यांनी दिली.

BRS party convention in Maharashtra

शेतकऱ्यांच्या सुखदुःखात समरस असलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) हे छत्रपती संभाजीनगर येथे २४ एप्रिल रोजी होणाऱ्या सभेला उपस्थित राहणार आहेत. आमखास मैदानात सायंकाळ ०६ वा. सभेला सुरुवात होईल, त्यांच्यासमवेत महाराष्ट्रातील अनेक शेतकरी नेते उपस्थित राहतील.

त्यांनी महाराष्ट्रात पुढील २०२४ च्या निवडणुकीसाठी रणशिंग फुकले असून, विदर्भात व मराठवाड्यात आत्महत्या थांबविण्याचा त्यांनी मानस बोलून दाखवला. या सभेच्या तयारीसाठी अमरावती, यवतमाळ, अकोला, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा येथे ठिकठिकाणी शेतकरी नेते सभा घेत आहेत.


विदर्भातील व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची होणारी दयनीय अवस्था पाहून ‘अबकी बार, किसान सरकार’ आणावे व पुढील निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रीयन जनतेला आवाहन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement