Ticker

6/recent/ticker-posts

विटा नगरपालिकेचा मुख्याधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

 

Vita-Municipality-chief-in-the-net-of-bribery-department

सांगली : सांगलीच्या विटा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे,दोन लाख रुपयांची लाच घेत असताना आपल्या केबिनमध्ये रंगेहाथ पकडण्यात आले.अवघ्या तीन महिन्यापूर्वीच त्याची विटा नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Sangli Bribe Case

विटा शहरातील एका ठेकेदाराकडे एका इमारतीचे बांधकाम परवानण्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली होती त्यातील रोख रक्कम दोन लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे, तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून माहिती दिली होती त्यानुसार या विभागाचे उपविभागीय अधिकारी संदीप पाटील यांनी आज दुपारी सापळा रचून ही कारवाई केली,त्याच्या केबिनमधून रोख स्वरूपात आणखी काही रक्कम मिळाली आहे,दरम्यान तीन महिन्यापूर्वी १० मार्च रोजी विनायक औधकर याची विटा पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाली होती आल्यापासून त्याने शहरातील बांधकाम व्यवसायिकांना आर्थिक दृष्ट्या त्रास देणे सुरू केले असल्याच्या तक्रारी सुरू होत्या.

Vita Municipality chief officer Vinayak Aundhkar in the net of bribery department

सायंकाळी पाच वाजल्यापासून विटा येथील खानापूर रस्त्यावरील एका विश्रामगृहावर पालिकेचे मुख्याधिकारी व लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांची कसून चौकशी सुरू आहे यातून अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement