Ticker

6/recent/ticker-posts

नेत्या शिवसेनेच्या अन् इथं कशाला रडताय?

ajit-pawar-answer-sushma-andhare-complaint-in-front-of-sharad-pawar
शिवसेना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सातारा येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या समोर भाषण करत असताना त्यांना रडू कोसळल त्या म्हणाल्या माझ्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करण्यात आली पण याच्या विरोधात विरोधी पक्ष नेते असणारे अजित पवार यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवणं गरजेचं होतं पोलिसांना एफआयआर दाखल करण्यासाठी सांगणं गरजेचं होतं,जे काय वक्तव्य केलं ते पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे त्याच्यावर नंतर तपास करण्यात आला असता असं सुषमा अंधारे सातारा येथील शरद पवार यांच्यासमोर सांगत असताना रडल्या होत्या.

याबाबत अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले,पवार म्हणाले की सुषमा अंधारे या शिवसेना पक्षाच्या नेत्या असून विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हेही शिवसेनेचे आहेत,शरद पवार यांचे समोर रडण्यापेक्षा जर सुषमा अंधारे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासमोर रडल्या असत्या तर त्याठिकाणी मला जेवढे अधिकार आहेत तेवढेच अधिकार अंबादास दानवे यांनाही आहेत,भावनिक होण्यापेक्षा त्या ज्या पक्षाचं काम बघतात, ज्या पक्षासाठी बाबा रे, काका रे, मामा रे करत आहेत आणि सभा घेत आहेत त्या पक्षाच्या विरोधी पक्षनेत्याला सांगितलं पाहिजे.”त्यांनी तिथं रडायला पाहिजे होतं असं अजित दादा पवार म्हणाले तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे म्हणाले की सुषमाताई अंधारे या तर रडरागिनी आहेत,अजित पवारांवर टीका केली की माध्यमांमधून प्रसिध्दी मिळते त्यामुळे अजित पवार यांचेवर टीका करण्याचा नवा ट्रेंड आला आहे असं वक्तव्य आमदार अमोल मिटकरी यांनी केल.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement